महागडा मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयिन मुलास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात.

महागडा मोबाईल चोरणाऱ्या अल्पवयिन मुलास पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यातपनवेल दि.18 (संजय कदम): एका महिलेच्या हातातील महागडा मोबाईल खेचून पसार झालेल्या एका अल्पवयिन मुलास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची बाल सुधारगृह कर्जत येथे रवानगी केली आहे.
           सौ. अंकिता बडे या रात्रीच्या वेळी दरबार वाईन परिसरातील रस्त्यावरून मोबाईल वर बोलत जात असताना सदर अल्पवयिन मुलाने त्यांच्याकडे असलेला 50 हजारांचा आयफोन लंपास केला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, पोलिस हवालदार रविंद्र राऊत, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत, पोशि विवेक तारासूर, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला असता सदर मुलगा हा रेल्वे स्टेशन परिसरात वावरत असल्याचे आढळून आल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.