नऊ मांजरांचा मृत्यू, तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

नऊ मांजरांचा मृत्यू, गुन्हा दाखलपनवेल दि.18 (वार्ताहर): मांजरांना जाणीवपूर्वक क्रूरपणे वागणूक देऊन त्यांना आवश्यक अन्न पाण्याची व्यवस्था न केल्याने नऊ मांजरांचा मृत्यू झाल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.               शफिकुननिसा अनिस अहमद सय्यद यांनी अपना अनीमल्स शेल्टर सिद्धी करवले याठिकाणी मांजराची तेरा पिल्ले सांभाळण्यासाठी दिली होती.दरमहा साडे तीन हजार रुपये देण्याचे त्यांचे ठरले. सय्यद व राबिया मोहम्मद यांनी ऍनिमल सेल्टर, सिद्धी करवले येथे भेट दिली. यावेळी त्यांना तेरा मांजरांपैकी फक्त चार मांजरे दिसून आली. उर्वरित मांजरांबाबत संगीताकडे चौकशी केली असता जास्त खाल्ल्याने ते आजारी पडून मयत झाले आणि गॅस्ट्रोने मेले असल्याचे सांगितले. यावेळी मांजराच्या पिल्ल्यांच्या डेडबॉडी विषयी विचारले असता कोणताही फोटो व रेकॉर्ड दिला नाही.  त्यामुळे शेल्टरची मालकीण संगीता हिने मांजरांना जाणीवपूर्वक क्रूरपणे वागणूक देऊन त्यांना आवश्यक अन्नपाण्याची व्यवस्था केली नाही व अस्वच्छ जागेत राहण्यास भाग पाडून मांजरांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही व त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण केला. यात नऊ मांजरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मालकीण संगीता यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published.