फ्लॅट भाड्याने न देता केली 3 लाख 80 हजारांची  फसवणूक.

फ्लॅट भाड्याने न देता केली 3 लाख 80 हजारांची  फसवणूकपनवेल दि.18 (वार्ताहर): भाडेकराराचे रजिस्टशन करून सदरचा फ्लॅट भाड्याने न देता तो दुसऱ्याला भाड्याने दिला व तीन लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.         जुई गाव, कामोठे येथील सोना श्रवण गुप्ता या नवीन घराच्या शोधात होत्या. संदीप मिश्रा याने अमित सुरेश पवार, चंद्रकांत बापू नागरे, उत्तम कांबळे यांच्यासह रूमच्या व्यवहारावर बोलणे झाले, त्यांच्यात 17 लाख ला रूमचा  व्यवहार ठरला. त्यानंतर त्यांच्यात रजिस्ट्रेशन करण्यात आले. सोना गुप्ता यांनी एकूण चार लाख 75 हजार रुपये त्यांना दिले. मात्र त्यांनी रूमचा ताबा दिला नाही. त्यांच्याकडे पैसे परत मागितले असता दोन चेक दिले, मात्र चेक बाऊन्स झाले. चंद्रकांत नागरे यांनी त्यांना तीस हजार रुपये परत दिले. त्यांनी केलेले रजिस्ट्रेशन गुप्ता यांनी पाहिले असता रजिस्ट्रेशन हे भाडेतत्त्वावरील असून सदरचा करार केल्यानंतर ती रूम गुप्ता यांना भाड्याने न देता दुसऱ्या इसमाला भाडेतत्त्वावर दिली. त्यामुळे संदीप मिश्रा(कामोठे), अमित सुरेश पवार (कामोठे), चंद्रकांत बापू नागरे (कामोठे), उत्तम कांबळे (नावडे), सुरेश रघुनाथ पवार (कामोठे) यांच्याविरोधात तीन लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

Leave a Reply

Your email address will not be published.