डोक्यावर सळईने मारून केले जखमी.
डोक्यावर सळईने मारून केले जखमीपनवेल दि.18 (वार्ताहर): लेबर कॉन्ट्रॅक्टर गावाहून आले की तुमचा पगार करतील या गोष्टीचा राग आल्याने मिस्त्री काम करणाऱ्या नितीन शाहू यास सळईसारख्या वस्तूने मारून दोघाजणांनी जखमी केले आहे. कृष्णा पाईक आणि जरुल याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन थय्या शाहू हा वाकडी येथे मिस्त्री काम करतो. त्याचा मामा किशोर साहू बांधकाम व्यवसायिक आहे. त्यांचा मामा लेबर कॉन्ट्रॅक्टर याच्या सांगण्यावरून अठरा लेबर लोकांचा पगार केला. यावेळेस सिमेंट उद्या येणार आहे, तुम्ही उद्या कामावर या असे त्यांनी सांगितले. त्यावेळी कृष्णा पाईक आणि जरूल यांनी पगार वेळेवर देत नाही तर कामावर येणार नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांचा मामा काँट्रॅक्टर किशोर शाहू हा गावाहून आला की पगार करतील असे सांगितल्याने याचा राग कृष्णा पाईक आणि जरूल याला आला आणि त्यांनी नितीन शाहू याला हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अंधारात डोक्यावर सळईसारख्या वस्तूने मारले. त्यानंतर कृष्ण पाईक व जरूल हे पळून गेले. नितीन शाहू याच्यावर एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचार सुरू आहेत.