प्रा. डॉ. रमेश म्हात्रे यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी गाईड शीप प्रदान.

प्रा. डॉ. रमेश म्हात्रे यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी गाईड शीप प्रदान

पनवेल दि.17 (वार्ताहर): रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय कार्यरत असलेले ग्रामीण विकास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश म्हात्रे यांना मुंबई विद्यापीठाने ग्रामीण विकास विषयातील पीएचडी मार्गदर्शक म्हणून नुकताच मान्यता दिली आहे. ते गेली २८ वर्षांपासून ग्रामीण विकास विषयातील अध्यापनाचे काम करत आहेत. या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागात भरीव कामगिरी केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाने त्यांना उत्कृष्ट प्रकल्प अधिकारी म्हणून पुरस्कार देऊन २००५ साली गौरविले आहे.

       ग्रामीण विकास विषयातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात भाग घेऊन अनेक शोधनिबंध सादर केले आहेत.  पनवेल महाविद्यालय विकास  समितीचे सदस्य म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत आहे.  मुंबई विद्यापीठातील एम.ए. ग्रामीण विकास विषयाच्या विद्यापीठ परिक्षेचे चेअरमन म्हणून प्रदिर्घ काळ काम पाहिले असून ग्रामीण विकास विषयाच्या अभ्यासक्रमावर त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना मुंबई विद्यापीठाने ग्रामीण विकास विषयातील पीएचडी गाईडशीप प्रदान  केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन, सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.