तरूण बेपत्ता पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल.

तरूण बेपत्तापनवेल दि.18 (संजय कदम): 21 वर्षीय तरूण राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
         नियाज युसुफ खान (वय-21) उंची 5 फूट 5 इंच, रंग निम गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, अंगाने मध्यम, उजव्या कंबरेवर तीळ आहे. तसेच डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ, जुन्या जखमेची खूण आहे. त्यांच्या अंगात काळ्या रंगाचा फूल पॅंट व मेहंदी रंगाचा फूल शर्ट घातलेला आहे. त्याला हिंदी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहीती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दुरध्वनी-02227452333 किंवा तपासी अमलदार पोना बी.ए. शिरसाट मो- 8369044679 येथे संपर्क साधावा.   

Leave a Reply

Your email address will not be published.