सार्वजनिक मित्र मंडळ व ग्रामस्थ शिवजयंती होळी निमित्त बैठक घेण्यात आली .

सार्वजनिक मित्र मंडळ व ग्रामस्थ शिवजयंती होळी निमित्त बैठक घेण्यात आली .
खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये
माननीय. श्री.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या दालनात सार्वजनिक मित्र मंडळ व ग्रामस्थ छत्रपती शिवाजी महाराज जयंती व होळी निमित्त बैठक घेण्यात आली.
16 मार्च सायंकाळी 7 च्या सुमारास ही बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनांमध्ये घेण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती अगदी शांततेत व नियमांचे पालन करत करण्यात यावी व मिरवणुकीला परवानगी नाही म्हणून आपण गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्याठिकाणी भजन कीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करावे असे सांगण्यात आले, तसेच आरोग्य शिबिर घ्यावे असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी याठिकाणी यांच्या बैठकीत आव्हान केले.
या ठिकाणी खांदा कॉलनी शहर मित्र मंडळ , शिवसेना खांदा कॉलनी ,शिवप्रेमी मित्र मंडळ नवीन पनवेल, शिवसेना शाखा शिवराज मित्र मंडळ वळवली, ग्रामस्थ उपस्थित होते. खांदा कॉलनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी नागरिकांना व मित्र मंडळ यांना आव्हान केले की आपण जर कार्यक्रम करत असाल तर आरोग्य साठी शिबिराचे कार्यक्रम राबवावेत जेणेकरून नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा जसे रक्तदान शिबिर,आय चेकअप, बॉडी चेकअप,कॅम्प राबवावे असे आवाहन या मंडळांना ह्यावेळी करण्यात आले.
शासनाकडून कोणतेही आदेश परिपत्रक आले तर ते जाहीर केले जातील असेही ह्या बैठकीत सांगण्यात आले,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर मा.श्री सुभाष कोकाटे ,पोलीस अधिकारी, सार्वजनिक मित्र मंडळ ह्यावेळी बैठकीत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.