करियर कट्टा या उपक्रमाचा नॅक मुल्यांकनामध्ये महाविद्यालयांना होणारा फायदा याविषयी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.      

करियर कट्टा या उपक्रमाचा नॅक मुल्यांकनामध्ये महाविद्यालयांना होणारा फायदा याविषयी राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न      
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः  करियर कट्टा या उपक्रमाचा नॅक मुल्यांकनामध्ये महाविद्यालयांना होणारा फायदा याविषयी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व शिक्षण महर्षी दादासाहेब लिमये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कार्यशाळा झूम मीटिंगद्वारे संपन्न झाली.                         उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र  यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी – आएएस आपल्या भेटीला व उद्योजक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला जात आहे . त्या उपक्रमाचा महाविद्यालयांच्या नॅक मुल्यांकनासाठी उपयोग होणार आहे त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ही कार्यशाळा म्हणजे भविष्यात बदलत्या शैक्षिणक धोरणावर संपूर्ण नित्ती मार्गदर्शक तत्वेच ठरली आहेत या कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक डॉ.एस.सी.लहुपंचांग ,डॉ. अविनाश मोहरील ,डॉ.राणी शितोळे , महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान व सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे या मान्यवरांनी साध्या सोप्या भाषेत हा गुंतागुंतीचा व तांत्रिक विषय अगदी साध्या सोप्या पद्धतीने सादर केला.या सर्व मान्यवरांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा अतिशय स्तुत्य कार्यक्रम ठरली आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.प्रीती महाजन यांनी केले आणि आभार प्रा.सीमा बाजी  यांनी मानले. किरण पाटील यांनी देखील कार्यशाळा पार पडण्यासाठी विशेष योगदान दिले . पुढील काळात महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयाच्यात करीअर कट्टा अंतर्गत सर्व क्रेडिट कोर्सेस,विविध उपक्रम आणि मार्गदर्शन केले जाणार आहे . महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनमध्ये  नक्कीच एक ऊर्जा व जागरूकता तयार होईल.  सर्व महाविद्यालय आपला दर्जा वाढीसाठी जे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही कार्यशाळा उपयोगी ठरणार आहे .तसेच शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी पुढील काळात हे मार्गदर्शन नक्कीच उपयुक्त ठरेल.सर्व महाविद्यालयांना ही कार्यशाळा पुढील यशस्वी वाटचालीसाठी पथदर्शकच ठरणार आहे.या कार्यशाळेचे सर्वच स्तरातून मोठे स्वागत आणि अभिनंदन होत आहे,हेच या कार्यशाळेच्या यशाचे प्रमुख वैशिष्ट्ये ठरले आहे.करीअर कट्टानी आयोजित केलेल्या कार्यशाळेत महाराष्ट्रातून असंख्य प्राचार्य, सर्व महाविद्यालयाचे आईक्यूएसी समितीचे सर्व सदस्य तसेच करीअर कट्टा विभागीय, जिल्हा समन्वयक उपस्थित होते. या करीअर कट्टा उपक्रमाचे नॅकमधील योगदानही कार्यशाळा येणार्‍या काळात महाविद्यालयांना संजीवनीच ठरणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.