GTI मधील २०० ड्राईव्हर्सची NMGKS संघटनेत घरवापसी
कामगार नेते श्री. महेंद्रजी घरत यांचे स्विकारले नेतृत्व.

GTI मधील २०० ड्राईव्हर्सची NMGKS संघटनेत घरवापसी
कामगार नेते श्री. महेंद्रजी घरत यांचे स्विकारले नेतृत्व.
पनवेल, दि.16 (वार्ताहर) ः   काही वर्षापूर्वी व्यवस्थापनाच्या ताटाखालचे मांजर असणाऱ्या युनियनच्या भुळथापांना बळी पडून संघटना सोडून गेलेल्या सर्व कामगारांची निराशा झाल्याने पुन्हा सर्व ड्राईव्हर्सना NMGKS संघटनेचे अध्यक्ष श्री. महेंद्रजी घरत यांचे नेतृत्व स्विकारले आहे.
 कोविड काळात NMGKS संघटनेने केलेले काम, कामगारांना केलेली मदत तसेच कुणाच्याही स्वप्नात नसताना ITF लंडन या आंतरराष्ट्रीय संघटनेबरोबर मागणी करून पत्रव्यवहार करून २६ हजार ते ५५ हजार कोविड भत्ता मिळवून दिला. पोर्ट मधील कायमस्वरूपी कामगार प्रमाणे कोविड मध्ये मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगाराला सुद्धा ५० लाखाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी जागतिक स्तरावर मागणी केली. ड्राईव्हर्सना येण्याजाण्यासाठी सुविधा करून दिली. हे व यासारख्या अनेक जिव्हाळ्याचे प्रश्न संघटनेचे कार्याध्यक्ष                श्री. पि. के. रामण यांनी सोडवून दिले त्यामुळे कामगारांना NMGKS संघटनेबद्दल आस्था वाटून सर्व कामगार पुन्हा एकदा मेजॉंरीटीने संघटनेत शामिल झाले.
संघटनेची द्वारसभा आज दिनांक १६ मार्च २०२२ रोजी GTI कंपनीच्या गेटवर संपन्न झाली. या द्वारसभेस संबोधित करताना संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते श्री. महेंद्रजी घरत म्हणाले की, जागतिक पातळीवर एक हजार डॉलर म्हणजेच ७५ हजार रुपये कोविड भत्ता जाहीर झाला परंतु GTI व मर्स्क व्यवस्थापनेने त्यामध्ये कपात केली तसेच टॅक्स हि कापण्यात आला हे योग्य नाही. हि कपात केलेली रक्कम NMGKS संघटना कामगारांना मिळवून देईल तसेच या अगोदर चार संघटनेत कामगार विभागले गेले होते त्यामुळे कामगारांना सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. परंतु आता सर्व कामगार एकजूट होवून NMGKS संघटनेच्या छत्रछायेखाली आले आहेत त्यामुळे कामगारांच्या न्यायीहक्कासाठी वेळ पडलीच तर GTI चा चक्काजाम करून कामगारांना त्यांचा पूर्वीचा सन्मान मिळवून देऊ असे ते म्हणाले.
 या द्वारसभेप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. पि. के. रामण, सरचिटणीस श्री. वैभव पाटील, उपाध्यक्ष  श्री. किरीट पाटील, नवीन शेवा सरपंच श्री. आदिनाथ भोईर, संघटनेचे संघटक श्री. लंकेश ठाकूर,  रविंद्र पाटील, श्री. आनंद  ठाकूर, श्री.संजय म्हात्रे, श्री. महेश घरत, श्री. अनिल कुमार, श्री. कल्पेश बादल, श्री. प्रशांत पाटील, श्री. ब्रम्हदेव यादव, श्री. गलांडे, श्री. कवडे, श्री. बापू गरुड, श्री. योगेश रसाळ, श्री. प्रल्हाद पाटील, श्री. केसरीनाथ नाईक, श्री. अरुण गिरी व श्री. किरण पाटील. तसेच शेकडोच्या संख्येने कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.