कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने महिला दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून कामोठे येथे महिला दिन विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उपस्थित महिलांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिराचे सुद्धा आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहुण्या म्हणून कॉलोनी फोरम अध्यक्षा तसेच नगसेविका लीना अर्जून गरड उपस्थित होत्या. यावेळी लीना गरड ह्यांनी उपस्थित महिलांशी मालमत्ता कराविषयी संवाद साधला तसेच कशाप्रकारे जनतेची लूट सुरु असल्याचे सांगितले. नारीशक्तीने एकजुटीने मालमत्ता करास विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच महिला दिन रोजच साजरा व्हायला हवा,महिलांनी आपल्या कलागुणांना वाव द्यायला हवा. आता नारी अबला नसुन सबला झाली असुन महिलांनी काळानुसार बदलायला हवं अणि आपल्या कर्तुत्वावर रोजच महिला दिन साजरा करावा असे मत नगरसेविका लीना अर्जुन गरड ह्यांनी मांडले. ह्यावेळी व्यासपीठावर कामोठे कॉलोनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा अणि प्रथमोपचार प्रशिक्षक सौ. वंदना आपटे उपस्थित होत्या. ह्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सामजिक क्षेत्रातील महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
कामोठे कॉलोनी फोरम महिला समन्वयकांच्या संकल्पनेतून हा महिला दिन विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमादरम्यान स्वागत गीत तसेच महिलेच्या आयुष्याची कहाणी सांगणारे गीत सादर करण्यात आले. चिमुकल्यांनी केलेल्या “बुगडी माझी सांडली ग” अणि “जन्म बाईचा जन्म आईचा ” ह्या गाण्यांवर सादर केलेल्या नृत्यांनी सोहळ्यात वेगळीच रंगत आणली. कामोठे फोरमच्या महिला सदस्यांतर्फे योगा डान्स तसेच तलवार बाजी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. महिलांसाठी “ओन द स्पॉट टास्क ” स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. विजेत्या महिलांना बक्षिसे देऊन सन्मानीत करण्यात आले.
सौ. वंदना आपटे ह्यांनी प्रथमोपचार शिबिरादरम्यान महिलांनी आपत्कालीन परिस्थितीत घाबरुन न जाता कशाप्रकारे प्रथमोपचार करावा ह्याची सविस्तर माहिती दिली. महिला दिन विशेष कार्यक्रमाची सांगता हळदीकुंकु समारभांने झाली. ह्यावेळी उपस्थित महिलांना वाण म्हणून पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.