गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडीला लागली आग…

गॅस सिलेंडरच्या स्फोटात झोपडी पेटलीपनवेल दि.10 (वार्ताहर)- एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने ती झोपडी पेटल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे फाटा येथे घडली असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही आहे.
            येथील से.-2 परिसरात असलेल्या रस्त्यावरील एका कोपऱ्यात झोपडपट्टी आहे. त्या झोपडपट्टीत मध्यरात्रीच्या सुमारास एका झोपडीत गॅस सिलेंडर स्फोट होऊन अचानकपणे आग लागली. या आगीची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी त्याठिकाणी धाव घेतली. तसेच तातडीने अग्निशमन दलाला व पनवेल शहर पोलिसांना कळविण्यात आले व ती पथकेसुद्धा त्वरीत घटनास्थळी पोचून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *