वाहने भाडेतत्वावर घेवुन ती स्वत:ची भासवुन परस्पर विक्री करणा-या ठगास अटक.

कोपरखैरणे पोलीस स्टेशन

वाहने भाडेतत्वावर घेवुन ती स्वत:ची भासवुन परस्पर विक्री करणा-या ठगास कोपरखैरणे पोलीसांकडुन अटक, रू. १,३६,४५,०००/- किंमतीची ११ वाहने

जप्त.

दिनांक 01/09/2021 रोजी फिर्यादींचे मालकीची सुझुकी कंपनीची इर्टीगा कार नं. एमएच 09 डीएम 4296 ही त्यांचे ओळखीचा आरोपी वैभव अनंता कोळी यांस विश्वासाने भाडेतत्वार दिलेली होती. त्याने ती भाडेतत्वावर न लावता सदरची कार स्वतःची असल्याचे भासवुन फिर्यादीचे संमतीशिवाय स्वतःचे आर्थिक फायदयासाठी त्रयस्थ इसमांस विकी करून फिर्यादिचा विश्वासघात करून अपहार न्यासभंग केल्याने कोपरखैरणे पोलीस ठाणेकडे गुन्हा रजि नं. 248/2021 भा.द.वि.सं. कलम 420,406,34 अन्वये दाखल आहे. सदरचा गुन्हा महत्वाचा असल्याने तो उघडकीस आणणेकरीता वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी

पोउपनिरी संतोष चौधरी यांचे पथक नेमले होते.

सदरच्या गुन्हयाचा कौशल्यपुर्ण व तांत्रिक तपास करून सदर गुन्हयातील आरोपी वैभव अनंता कोळी यास दिनांक 27/09/2021 रोजी 20.00 वा. सदर गुन्हयात अटक करून त्याचेकडुन गुन्हयातील फिर्यादी यांचे वाहनासह व साक्षीदार यांचे इतर वेगवेगळी एकूण 11 वाहने, रू. 1,36,45,000/- किंमतीचे त्यांचे ओरिजनल कागदपत्रासह हस्तगत करून उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे. तसेच सदर गुन्हयांतील पाहिजे आरोपी नामे साउद कलदने व अशिष मेमन यांचा कसोशिने शोध सुरू आहे. अटक आरोपीकडुन जप्त केलेली वाहने खालील प्रमाणे :

अ.क किंमत 1 2 3. 4 5 6 गाडयाचे वर्णन इर्टीगा कार कं MH-46-BV-3515, इर्टीगा कार कं MH-04-KD-0714, इनोव्हा कार क. MH-46-AP-6118, सीयाझ कार क. MH-43-AW- 2163, इर्टीगा कार क. MH-04-JM- 4811, एक्सेन्ट प्राईम कार नं. MH-14-HU-3543, इनोव्हा कार कं. MH-01-AR-5554, इर्टीगा कार क. MH-46-AD-4577, इन्व्होव्हा कार क. MH-04-ED-6704 इर्टीगा कार क. MH-09-DM 4298 इर्टीगा कार क. MH-43-BE-4478. रू. 10,80,000/रू. 10,80,000/रू. 15,00,000/रू. 15,00,000/रू.10,50,000/रू. 09,75,000/B. 15,50,000/रू.12,00,000/रू. 15,50,000/रू. 10,80,000/रू. 10,80,000/17. 1,36,45,000/7 8 8 9 10 11 एकुण किंमत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *