नागरिकांनी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांचे आभार मानले.

आज कळंबोली प्रभाग क्र.१० मधील बिकानेर स्वीट्स ते जाधव वाडी पर्यंत रस्त्यात मोठं मोठे खड्डे असल्याने नागरिकांना या रस्त्यात ये जा करण्यासाठी नाहक त्रास होत होता. यासाठी श्रीवेंकटेश्वर को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, श्री सिद्धी को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी, सेक्टर 1 साईनाथ रहिवासी संघ, सेक्टर 1 श्री अपार्टमेंट सोसायटीमधील नगारीकांनी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या कडे तक्रार केल्याने सदर विषयाची नगरसेवक रवींद्र भगत यांनी दखल घेऊन स्वखर्चाने एक डंपर ग्रीट (खडी-माती) आणि जेसीबी लावून हे खड्डे बुजवण्यात आले. यासाठी नागरिकांनी नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *