लॉकडाऊन पश्‍चात स्थानिक मराठी तरुण तरुणींना नोकरी व्यवसायात प्राधान्य देण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल, दि.10 (वार्ताहर) : लॉकडाऊनच्या पश्‍चात स्थानिक मराठी तरुण तरुणींना उद्योग धंद्यात प्राधान्य द्यावे अशी मागणी शिवसेना पनवेल तालुका उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या वैश्‍विक महामारीच्या अत्यंत गंभीर परिस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ज्या उत्तमरितीने महाराष्ट्र एकसंघ ठेवून जनतेला आधार देत आहेत. त्यांनी त्यांची कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेत आहेत. लॉकडाऊन पश्‍चात मराठी तरुण तरुणींना त्यांनी नोकर्‍या, व्यवसाय उपलब्ध करून  द्यावेत त्यामुळे उद्योग धंदे सुद्धा वाढीस लागतील व स्थानिक भूमीपुत्रांना नोकरी व्यवसाय मिळतील. त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारेल व मनुष्य बळाची कमतरता भासणार नाही व झालेले नुकसान भरुन निघेल. तरी मराठी भूमीपुत्रांना प्राधान्य द्यावे. तसेच त्यांना नवनवीन उद्योग धंदे उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी गुरुनाथ पाटील यांनी केली आहे.

फोटो : गुरुनाथ पाटील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *