रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना करण्यात आले मास्कसह सॅनिटायझरचे वाटप
पनवेल दि.02 (वार्ताहर)- सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी चौथा स्तंभ म्हणून वावरणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी म्हणून रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल पोतदार यांच्यासह इतर पदाधिकारी व सदस्य पत्रकारांच्या उपस्थितीत रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, अक्षय कांडपिळे, अड. मितेश पाटील आदींनी मास्कसह सॅनिटायझरचे वाटप केले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारसुद्धा प्रत्येक घटना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 24 तास जागरूक असतात. अशांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवित असल्याचे अध्यक्ष भरत शिंदे यांनी यावेळी सांगितले.
फोटोः रोटरी क्लब ऑफ कळंबोलीच्या वतीने पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या पत्रकारांना मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करताना रोटरी क्लब ऑफ कळंबोलीचे अध्यक्ष भरत शिंदे, नाना कांडपिळे, रावसाहेब जाधव, अक्षय कांडपिळे, अड. मितेश पाटील आदी