क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे, व निकेशा केमिकल्स प्रा. ली. चे प्रोप्राईटर मृगेश दोषी ह्यांनी केले प्रत्येकी पोलीस ठाण्यात जाऊन ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप..
पनवेल दि. 27 रोजी सामाजिक बांधिलकी तसेच समाजासाठी कार्यरत असलेले पोलीस प्रशासन ह्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या वतीने पनवेल येथील खांदेश्वर पोलीस स्टेशन येथे अधिकारी व कर्मचारी ह्यांना त्या ठिकाणी ५ लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्व पोलीस वर्ग प्रत्येक वेळी लोकांपर्यंत पोहचत आहेत व सतत जागरूक असतात. अशांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवित आम्हा सर्वांना ह्या वेळी ही मदत करणे ही तितकेच गरजेचे आहे असे सांगत पोलीस अधिकारी ह्यांनी आभार मानले.
खांदेश्वर पोलिस ठाणे ह्यांना सॅनिटायझरचे वाटप करताना क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे सह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते…