मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी सुरू केले भाजीपाला विक्री केंद्र; गर्दी टाळून सोशल डिस्टसिंग पाळण्याचे केले आवाहन
पनवेल, दि.2 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेचे मा.उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आपल्या प्रभागातील रहिवाशांना भाजीपाला घेण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये याकरिता त्यांनी पायोनिअर विभागातील जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्रीची व्यवस्था सुरू केली आहे.
तसेच या 9029467473 या क्रमांकावर आपली भाजी ची ऑर्डर (आपल्या नाव व पूर्ण पत्यासह) ’आदल्या दिवशी’ ुहरीीं रिि केल्यास आपणास होम डिलिव्हरी देण्याचाही प्रयत्न करणार आहेत. परंतु होम डिलिव्हरी ही ’भाजी व वेळेची उपलब्धता’ यावर अवलंबून असल्याने काही पुढे मागे झाल्यास सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. तसेच होम डिलिव्हरी गार्डन हॉटेल परिसर, बिर्मोले हॉस्पिटल परिसर,कफ नगर,पायोनियर विभाग, ठाना नाका रोड,चिंतामणी हॉल परिसर,नवीन कोर्ट परिसर, परदेशी अळी,लोकमान्य टिळक रोड,पटेल पार्क सोसायटी परिसर,जुनी ओम बेकरी परिसर, गोखले हॉल परिसर या भागातच देणे शक्य होणार असल्याने कृपया इतर ठिकाणाहून ऑर्डर देऊ नये. तरी कृपया या सेवेचा लाभ घ्यावा, असे विक्रांत पाटील यांनी आवाहन केले आहे. सदर भाजीपाला विक्री केंद्र विक्रांत बाळासाहेब पाटील जनसंपर्क कार्यालय, मॉडर्न स्वीट जवळ, संघमित्रा सोसायटी, शॉप 17,प्राचीन हॉस्पिटल जवळ, पनवेल वेळ – सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत उपलब्ध असणार आहे.
फोटो: विक्रांत पाटील यांनी प्रभागातील नागरिकांसाठी सुरू केलेले भाजीपाला विक्री केंद्र