मराठा समाज खारघर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधिसाठी एक लाख रूपयाची देणगी

पनवेल, दि.2 (वार्ताहर): खारघर शहरामध्ये गेली 9 वर्ष सामाजिक उपक्रमामध्ये सातत्याने अग्रभागी असणारे मराठा समाज खारघर या सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यात उद्भवलेल्या कोरोना सारख्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रूपयाचा निधी देण्यात आला.यापूर्वी अनेकवेळा राज्यात निर्माण झालेल्या अनेक संकटाच्या वेळी मराठा समाज खारघर या संस्थेच्या वतीने वेळोवेळी आर्थिक मद्दत केलेली आहे. पुलमवा हल्ला, सांगली, सातारा आणि कोल्हापुर येथील महापुर याशिवाय अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होत सढळ हाताने मदतीसाठी पुढकार घेऊन आपले सामाजिक भान संस्थेने जपले आहे.
सध्या संपूर्ण जगावर महाभयंकर कोरोनाचे संकट आहे. देशातील आणि महाराष्ट्रातील जनता भयभीत झालेली आहे. अश्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून मराठा समाज खारघरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधि म्हणून 1 लाख रूपयाचा धनादेश साम टी वी चे हर्षल बदाने पाटील याचे मार्फत प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, सह.आयुक्त रसाळ, उपायुक्त जमीर लेगरेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहयता निधीसाठी सुपुर्द करण्यात आला. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य बी.ए.पाटील यांनी दिली. त्यांचा सोबत संस्थेचे कार्यध्यक्ष कालिदास देशमुख, सचिव प्रताप पाटील, खजिनदार नवले, शशिकांत जाधव, सौ राजश्री कदम, सौ अलका कदम, सौ वृषाली शेडगे, अर्जुन गरड, संजय कंदारे, राजू कदम इत्यादी मंडळीने एक मताने ठराव करुन मदत केली. मराठा समाज खारघर ह्यांच्या वतीने राबवलेला उपक्रम आणि मदतीसाठी घेतलला पुढकार कौतुकास्पद आहे.
फोटो: मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाखाचा धनादेश देताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *