नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून रास्त भावात भाजी विक्री केंद्र सुरू
पनवेल दि.31 (वार्ताहर)- आज जगभरात व आपल्या देशा मध्येही करोना सारख्या महारोगराईने थैमान घातले आहे. पनवेल मध्ये ही काही प्रादुर्भाव झालेले रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे पनवेल मधील नागरिकांना स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या दैनंदिन गरजे खातर त्यांना दूध, फळे, भाजीपाला सारख्या गोष्टी खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडावे लागत आहे. सदर बाब भाजपा नगरसेवक नितीन पाटील यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी मंगळावर दि. ३१ मार्च २०२० रोजी सारस्वत बँके जवळ, स्वामी नित्यानंद मार्ग येथे बाजारातील गर्दी टाळण्यासाठी रास्त भावात भाजी विक्री केंद्र सुरू केले.
पहिल्या च दिवशी राहिवाश्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून येथील रहिवाश्यांनी त्यांचे आभार मानले. सदर भाजी विक्री केंद्र चालू करण्यामागील हेतू स्पष्ट करताना नितीन पाटील यांनी सांगितले की या संकल्पे मुळे भाजी मार्केट यार्ड येथे होणारी गर्दी कमी होण्यास मदत तर होईलच, तर नागरिकांना गर्दी मुळे होणाऱ्या करोना सारख्या संसर्गजन्य रोगापासून दूर रहाण्यास मदतच होईल. हे केंद्र रोज सकाळी ७.०० ते सकाळी ११.०० या वेळातच खुले राहणार आहे तरी सर्व नागरिक / रहिवाश्यांनी सदर वेळात भाजी खरेदी करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
फोटोः नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले रास्त भावात भाजी विक्री केंद्र