शाम देवी माता ट्रस्ट व हाजी शनवाज खान फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले पोलीस बांधवांना फुड पॅकेटचे वाटप
पनवेल, दि.1 (वार्ताहर): कोरोना या विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे अश्या या परीस्थित पोलीस बांधाव आपले कार्य करत आहे. पोलिसांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याने त्यांना शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन यांच्यावतीने कामोठे येथील पोलीस ठाण्यामधील कर्मचार्यांना फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले.
शाम देवी माता ट्रस्ट तसेच हाजी शनवाज खान फाऊंडेशन हे गेल्या काही दिवसापासून अनेक ठिकाणी गोर गरीब लोकांना मदत करत आहे. येणार्या 14 एप्रिल तारखेपर्यंत असेच त्यांचे कार्य सुरू राहणार आहे अशी माहिती शनवाज खान फाऊंडेशनचे अध्यक्ष शनवाज खान यांनी दिली. यावेळी शाम देवी ट्रस्टचे सिद्धू कांबळे, सुनी दवते इस्लामचे अकील सय्यद, हिंदू मुस्लीम एकता गोंगाटचे शैनाज खान, शाम देवी ट्रस्टचे विजय पाल, धर्मेश शर्मा, समाजसेवक इरफान तांबोळी, समाजसेवक वसीम मस्ते, दिलीप पाल, अनिल शुक्ला आदी उपस्थित होते.
फोटो: शाम देवी माता ट्रस्ट व हाजी शनवाज खान फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले पोलीस बांधवांना फुड पॅकेटचे वाटप