माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने अ‍ॅन्टी कोरोना फवारणी तसेच भाजीपाला विक्री केंद्र

पनवेल, दि. 1 (वार्ताहर) कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी प्रभाग क्र. 18 परिसरासाठी अ‍ॅन्टी कोरोना फवारणी तसेच तेथील रहिवाशांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी जास्त लांब जाण्याची आवश्यकता पडू नये यासाठी जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्री केंद्र सुरू केले आहे.

महानगरपालिकेचे क्षेत्र फार मोठे असल्याने प्रत्येक मजल्यावर फवारणी करणे शक्य होत नाही. प्रभाग क्र.18 मधील नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीपोटी प्रत्येक बिल्डींगमध्ये कार्यकर्त्यांच्या साथीने जावून प्रत्येक घराच्या दारापर्यंत अ‍ॅन्टी कोरोना (सोडीयम हायपोक्लोराईड) फवारणी करून विक्रांत पाटील करून घेत आहेत. तसेच शासनाच्या आदेशानुसार लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी भाजीपाला खरेदीसाठी प्रभाग क्र. 18 येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ भाजीपाला विक्रीची व्यवस्था त्यांनी केली आहे. तसेच 9029467473 या क्रमांकावर रहिवाशी आपल्या भाजीची ऑर्डर (आपल्या नाव व पुर्ण पत्यासह) आदल्या दिवशी व्हॉटसअप केल्यास त्यांना होम डिलिव्हरी देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती विक्रांत पाटील यांनी दिली आहे. सर्वांनी एकत्रित येवून घरातच थांबून कोरोनाला हद्दपार करायचे आहे. तरी सर्वांनी पनवेल महानगरपालिका, पोलीस ठाणे व पनवेल उपजिल्हा रुग्णालय यांना सहकार्य करावे असे आवाहन नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केले आहे.

फोटो: विक्रांत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *